श्रद्धालाही लग्नाचे वेध लागले आहेत की काय असे आता श्रद्धा कपूर च्या चाहत्यांना लागले आहे कारण गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर फोटोग्राफर रोहन श्रेष्ठासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे . आता तिच्या लग्नाच्या बातम्याही जोर धरू लागल्या आहेत . रिलेशनशिपमुळे चर्चेत असलेल्या श्रद्धाने अजून तरी यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही . सोशल मीडियावरील श्रद्धाचे काही फोटो पाहून रसिकांमध्ये वेगळीच कुजबुज सुरू झाली आहे . फोटोंमध्ये श्रद्धाचा लूक कुणालाही घायाळ करेल असाच आहे . नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजशृंगार केलेल्या श्रद्धाचा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे.लाडक्या श्रद्धाचा लूक तर लय भारीमात्र ती लग्न करणार की काय यावर चर्चा रंगत आहेत .
Home » श्रद्धालाही लग्नाचे वेध लागले आहेत की काय?