संगीतात आवड असणाऱ्यांना व दहावी उत्तीर्ण असलेल्यांना Indian Navy मध्ये आहे सुवर्णसंधी.

खान्देश टाईम्स : म्युझिक विषयात आवड व ज्ञान असलेल्या उमेदवारांना भारतीयभारतीय नौदलात काम करण्याची सुवर्ण अशी संधी मिळू शकते . या पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत . नोकर भरतीच्या संदर्भामध्ये भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेत स्थळावर वेळोवेळी माहिती प्राप्त होत असते .

Indian Navy पात्रतेचा निकष :

संगीतकार नाविक होण्याकरिता , एखाद्याने कोणत्याही मान्यताप्राप्त असलेल्या मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . उमेदवाराला संगीताचे उत्तम असे ज्ञान असावे व त्याला विविध प्रकारची वाद्ये वाजवण्यात महारत असणे आवश्यक आहे . पाश्चात्य व भारतीय दोन्ही वाद्यांसह संगीताचे विशेष असे ज्ञान आणि कोणतेही वाद्य वाजवण्याचे व्यावहारिक स्वरूपाचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

 

Indian Navy वयाची मर्यादा :

वय १७ ते २० वर्षे आहे . विशेष अशा परिस्थितीत गुणवंत उमेदवारांना वयात सवलत दिली जाऊ शकते .

 

Indian Navy उमेदवारासाठी अटी :

उमेदवाराची किमान उंची हि १५७ सेमी असावी व वजन त्याच प्रमाणात असणे आवश्यक आहे . छातीचा विस्तार ५ सेमी असावा . या पदाकरिता केवळ शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी उमेदवारच पात्र मानले जाणार आहे.

 

Indian Navy  पगाराबाबत:

प्रशिक्षणाच्या दरम्यान , उमेदवारांना दर महिन्याला १४ हजार ६०० रुपये स्टायपेंड म्हणून दिले जातील . प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना संरक्षण वेतन स्केलप्रमाणे २१,७०० ते ६ ९ , १०० रुपये पगार दिला जातो . त्याच बरोबर नियमानुसार दरमहा DA दिला जातो .

 

 Indian Navy संगीतातील क्षमता :

चाचणी उमेदवाराला संगीता करिता ओरल अॅप्टिट्यूडमध्ये टेम्पो , पिच व संपूर्ण गाणे गाऊन उत्तीर्ण होणे गरजेचे आहे . यासाठी उमेदवाराला कोणतेही भारतीय किंवा पाश्चात्य वाद्य वाजवता येणे आवश्यक आहे. उमेदवाराला देशी – विदेशी संगीताची मूलभूत अशी तत्त्वे माहित असणे आवश्यक आहे . शिवाय संगीत वाद्यांची ट्युनिंग करणे , अज्ञात संगीताच्या नोट्स वाद्यांशी जोडणे याची माहिती असणे अनिवार्य आहे .

 

Indian Navy   फिजिकल फिटनेस ( PFT ) :
  1. भारतीय नौदलातीलनौदलातील संगीतकार खलाशांच्या निवडीकरिता शारीरिक तंदुरुस्ती चाचणी ( PFT ) ७ देखील घेतली जाणार आहे . PFT मध्ये ७ मिनिटांत १.६ किमी धावणे , २० स्क्वॅट्स आणि १० पुश – अप यांचा समावेश असतो .

Leave a Reply

Your email address will not be published.