सर्व कुटुंबातील सदस्यांनी एकाचवेळी घेतले उंदीर मारायचे औषध.

 

भुसावळ : आर्थिक अडचणीमुळे रिक्षाचालकासह त्याच्या संपूर्ण परिवारातील चारही सदस्यांनी शुक्रवार , १० रोजी रात्री ११.३० वाजता विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे . यामध्ये तीन जण अत्यवस्थ आहेत . वांजोळा रोडवरील गोकुळधाम रेसीडेन्सीत विलास प्रदीप भोळे ( ६० ) हे रिक्षाचालक त्यांच्या पत्नी व दोन मुलांसह राहत होते . विलास यांच्यासह लता विलास भोळे ( ५२ ) , प्रेरणा विलास भोळे ( २८ ) , चेतन विलास भोळे ( २७ ) यांनी विष प्राशन केल्याचे कळाल .

ही संपूर्ण घटना रात्री उशिरा गल्लीतील नागरिकांना कळताच त्यांनी पोलिसांना माहिती कळवली .पोलिसांनी तात्काळ चारही जणांना खासगी दवाखान्यात हलविले . यापैकी चेतन याची प्रकृती धोक्याबाहेर असून बाकी असलेले तीन जण अत्यवस्थ असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे . पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासह बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ त्याच बरोबर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली .

Leave a Reply

Your email address will not be published.