सहा फुटांची मूर्ती विक्री करणाऱ्याविरुद्ध गुन्हा.

जळगाव : सार्वजनिक गणेश मंडळांना चार फुटांची , तर घरांमध्ये दोन फुटांपर्यंत गणेश मूर्तीची स्थापना करावी , अशी मर्यादा शासनाने घालून दिली आहे . तसे असतानाही मेहरुण परिसरातील पाण्याच्या हौदाजवळ चंद्रकांत प्रकाश वरणे हा मर्तिकार सहा फुटांची गणेश मूर्ती विक्री करीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना गुरुवारी रात्री मिळाली . साडेदहा वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांनी मेहरुण गाठले . त्यावेळी त्यांना एक व्यक्ती गणेशमूर्ती विक्री करताना दिसून आली . दुकानात जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी सहा गणेश मूर्ती सहा फुटांच्या आढळून आल्या , तर मूर्तिकाराचे नाव विचारले असता , त्याने चंद्रकांत वरणे असे सांगितले . दरम्यान , नियमांचे उल्लंघन केले म्हणून मूर्तिकाराविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.