साडेपाच एकरातील ऊस ठिणग्या पडताच जळून खाक

शेअर करा.

धुळे : तावखेडा शिवारात शॉर्टसर्किट झाल्यामुळे हजारो रुपयांचा ऊस हा जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २ ९ रोजी दुपारी घडलेली होती . या घटनेची नोंदणी रविवारी दोंडाईचा पोलिसात करण्यात आलेली होती .

निंबा नारायणसिंग गिरासे यांनी साडेपाच एकर जमिनीमध्ये त्यांनी उसाचे पीक घेतले आहे . त्यांच्या तावखेडा शिवारातील उसाच्या शेताजवळून वीज वितरण कंपनीचे तार गेलेले आहेत . शिंदखेडा तालुक्यामध्ये २ ९ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पक्ष्यांमुळे शेतातून गेलेल्या त्या वीजतारांचे एकमेकांनमध्ये घर्षण झाले . तारांचे घर्षण अधिक झाल्यामुळे त्याच्या मोठ्या प्रमाणावर ठिणग्या खाली पडल्या .

आगीच्या ठिणग्या पडताच कोरडा झालेल्या उसाने लगेच पेट घेतला . साडेपाच एकरातील ऊस हा जळून खाक झाला . आगीचे लक्षात येताच विझविण्याकरीता प्रयत्न करण्यात आले असता ते पुरेसे नव्हते . याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी अग्नी उपद्रवची नोंद करण्यात आलेली आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply