सारंगखेडात घोड्यांच्या विक्रीत जवळपास 80 लाखांची उलाढाल

सारंगखेडा : सारंगखेड्याच्या घोडेबाजारात यावर्षी एलएक्स नावाच्या घोड्याला चक्क सव्वाकोटींची किंमत लावण्यात आलेली आहे . त्याच्यासोबतच ‘ रुबी ‘ नावाच्या घोडीला ३५ लाखांची किंमत लावली गेली आहे . एलएक्स व रुबी या वर्षाचे आकर्षण ठरले आहे . सारंगखेडा येथील घोडेबाजार देशात प्रसिद्ध आहे .

येथील बाजारात तीन दिवसांत २२१ घोड्यांची विक्री झाल्याचे कळाल असून , त्यातून ८० लाखांची उलाढाल झालेली आहे . मागील वर्षी कोरोनामुळे बाजार भरला नव्हता . यंदा काही अटी व शर्ती यांच्या आधारे बाजार भरविण्यात आला आहे . एक हजार ६० घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत .जालना या ठिकाणचे अब्दुल सौदागार यांचा हा घोडा असून त्यांनी पुणे येथील.घोडदौड स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला होता .

Leave a Reply

Your email address will not be published.