सावधान …कन्नड घाटात दरड कोसळली ; अनेक गाड्या पडल्या अडकून,औरंगाबाद – धुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद.

शेअर करा.

कन्नड घाटात दरड कोसळल्याने पहाटे दोन वाजेपासून औरंगाबाद – धुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे . या कारणामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत . मुसळधार पावसामुळे औरंगाबादच्या कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली आहे . घाटात मदतकार्य सुरू असून खा . उन्मेष पाटील , माजी मंत्री आ.गिरीश महाजन , आ.मंगेश चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजित राऊत पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी भेट देत आढावा घेतला आहे . कन्नड घाटात चिखलाचं साम्राज्य असल्यामुळे अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत . घाटातील दरड आणि चिखल जोवर दूर केला जात नाही , तोपर्यंत घाटातील वाहतूक सुरळीत होणं अशक्य आहे . सध्या महामार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आहे . तरी नागरिकांनी प्रवासासाठी या रस्त्याचा वापर करू नये , औरंगाबादला जाण्यासाठी नांदगाव मार्गाचा वापर करावा , तसेच औरंगाबादहून येण्यासाठी जळगाव मार्गाचा वापर करावा , असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे .

सकाळपासूनच घाटात मदतकार्य सुरू असून अनेक वाहने चिखलात अडकून पडली आहेत घाटात मदतकार्याच्या ठिकाणी खा.उन्मेष पाटील , माजी मंत्री आ.गिरीश महाजन , आ.मंगेश चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजित राऊत , पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी भेट देत आढावा घेतला आहे . तसेच महामार्गावरील वाहतूक लवकरात लवकर सुरळीत व्हावी यासाठीही प्रयत्न सुरू आहे.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply