• Tue. Aug 16th, 2022

  सासू-सासऱ्यांचा जाचाला कंटाळून शिरसोली येथील युवकाची आत्महत्या

  ByKhandeshTimes

  Nov 30, 2021

   

  जळगाव : तालुक्यामधील शिरसोली याठिकाणी सासू – सासऱ्याच्या जाचाला कंटाळून एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली असताना आत्ता अजून जळगाव शहरात आणखी एका तरुणाने पत्नी आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक अशी घटना घडलीय . पंकज उखई खाचने ( वय -२७ ) रा . आसोदा रोड , गोपाळपूरा , असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून दिड पानाची सुसाईड नोट आढळून आलीय . या प्रकरणाबद्दल शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे .

  रविवारी २८ नोव्हेंबरला सकाळी पंकजची आई कल्पनाबाई बळीराम पेठला भाजीपाला घेण्याकरिता गेलेली असताना त्यावेळी पंकज हा घरी एकटाच होता . पंकजने याने राहत्या घरात घराचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेवून आत्महत्या केल्याचे कळाले आहे. आई कल्पना ह्या दुपारी १२ वाजेला घरी आल्या तेव्हा दरवाजा हा आतून बंद होता . शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता पंकजने गळफास घेतला असल्याचे दिसून आले . मुलाने गळफास घेतल्याचे पाहून आईने जोरजोराने हंबरडा फोडला होता . आत्महत्या करण्यापुर्वी पंकज खाचने यान दिड पाना इतके सुसाईड नोट लिहिली होती . यात पत्नी , शालक , पोलीस असणारे सासरे व सासू यांच्या छळाला कंटाळून मी आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठी मध्ये नमूद आहे . सुसाईड नोट ही पोलीसांनी ताब्यात घेतली आहे . याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदणी करण्यात आली आहे .

  यादरम्यान , सकाळीच शिरसोली येथे सासू सासऱ्याच्या जाचाला कंटाळून एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना पडलेली होती . या घटनेला काही तास उलटत नाही तोपर्यंत जळगावात ही दुसरी घटना घडली आहे.

  Leave a Reply

  Your email address will not be published.