सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराने दुःखद निधन

शेअर करा.

पुणे : अनाथांकरिता सेवाकार्य करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारच्या रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . सिंधुताई या ७४ वर्षांच्या होत्या . महिनाभरापूर्वी त्यांचे ऑपरेशन झालेले होते .यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते . त्यांच्या या निधनाने हजारो अनाथ बालकांची माय हरवली आहे . त्यांच्या पार्थिवावर बुधवारी पुण्यातील शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .

वयाच्या ९ व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेले श्रीहरी सपकाळ यांच्याशी त्यांचा विवाह झालेला होता . अनेक संघर्षाना तोंड देऊन त्यांनी हजारो अनाथ बालकांचे पालकत्व करण्याचे स्वीकारले होते . सिंधुताई यांनी अनाथ बालकांसाठी १ ९९ ४ साली पुण्याजवळच्या पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. त्यांनी लहान मुलांच्या शिक्षणापासून तर उज्ज्वल भविष्याची जबाबदारी त्यांच्या हाती घेतलेली होती .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply