सिव्हिलचा भोंगळ कारभार : व्हेंटिलेटर नसल्याने दोन दिवसांनंतर झाले बालकावर उपचार, मग काय झाले!

सिव्हिलचा पुन्हा भोंगळ कारभार समोर आला आहे . झाले असे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लहान बालके मोठ्या संख्येने दाखल असल्याने काही व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते . परिणामी भानखेडयाच्या २८ दिवसांच्या बालकावर दोन दिवसांनंतर दुसऱ्या वॉर्डातील व्हेंटिलेटर आणून उपचार करण्यात आले . वातावरणात बदल झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात ४२ बालके उपचार घेत आहे . यातच रविवारी जामनेर तालुक्यातील भानखेडा येथील २८ दिवसाच्या बालकाला श्वासघेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात आणण्यात आले . प्रकृती खराबी असतानाही व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने बालकावर उपचार झाले नाही . अखेर नातेवाइकांनी मंगळवारी अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद यांना परिस्थिती सांगत उपचार करण्याबाबत विनवणी केली अधिष्ठाता रामानंद यांनी तात्काळ वॉर्डात जाऊन पाहणी करत परिस्थिती जाणून घेतली . त्यानंतर १४ नंबर वॉर्डात असलेले व्हेंटिलेटर लहान मुलांच्या आयसीयूमध्ये हलवण्यात आले व बालकावर उपचार सुरु करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published.