• Tue. Aug 16th, 2022

  सीए इंटरमिजीएट परीक्षेचा जाहीर झाला निकाल.

  ByKhandeshTimes

  Sep 22, 2021

  जळगाव : दि इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांच्या वतीने जुलै महिन्यात राबवण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट परीक्षेचा रिजल्ट हा नुकताच लागला आहे . यामध्ये जळगाव शहरांमधून सीए इंटरमिजिएटच्या नवीन कोर्सच्या दोघ ग्रुपमधून दीप पाचपांडे पहिल्या स्थानावर तर अनुश्री चांदीवाल द्वितीय व जिमित बाझल हा तृतीय स्थानावर आहे . जुलै महिन्यात ही परीक्षा घेण्यात आलेली असून . न्यू कोर्समधून पहिल्या ग्रुपसाठी ८३ विद्यार्थ्यांपैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत . दुसऱ्या ग्रुपसाठी एकूण ६८ विद्यार्थ्यांपैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत . दोन्ही ग्रुपसाठी ६६ विद्यार्थ्यांपैकी फक्त २२ विद्यार्थ्यांनी प्रथम ग्रुप उत्तीर्ण केला आहे तर जवळ पास ६ विद्यार्थ्यांनी दोघ ग्रुप उत्तीर्ण झालेले आहेत . याबरोबर जुन्या कोर्समधून द्वितीय ग्रुपसाठी एकूण ४४ विद्यार्थ्यां पैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे कळाले आहे . दोघ ग्रुपसाठी १६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते . यांपैकी केवळ दोन विद्यार्थी प्रथम ग्रुप उत्तीर्ण झाले आहे . या विद्यार्थ्यांचे सीए शोखेचे अध्यक्ष असलेले प्रशांत अग्रवाल आणि कार्यकारिणी सदस्यांनी अभिनंदन केले आहे .

  Leave a Reply

  Your email address will not be published.