सीसीटीव्हीचा बसवणार शिवभोजन थाळीकेंद्रवर,होणार संपूर्ण तपासणी.

शेअर करा.

ठाणे : चालूच झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवभोजन थाळीच्या वाटपात केंद्र चालकांकडून खोट्या स्वरूपाच्या नोंदी दाखवून लाखो रुपये लूटले जात असल्याचा आरोप केला होता . यानंतर , असे गैरव्यवहार काढण्याकरिता राज्यातील सर्व शिवभोजन थाळी केंद्राच्या संचालकांनी ३१ जानेवारी , २०२२ शेवटपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने काढले आहेत .

 

विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामधिल सर्व शिवभोजन केंद्रांवर ३१ जानेवारीपर्यंत सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात येणार आहेत किंवा नाही , याची संपूर्ण तपासणी करून कार्यवाही करावी . शिवभोजन केंद्राचे देयक देत असताना तक्रार आल्यास सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत अनियमितता आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जावी , असे आदेशात सांगितली आहे .

 

सरकारच्या निर्देशा प्रमाणे शिवभोजन थाळीत खाद्यपदार्थ मिळतात का , पिण्याचे पाणी स्वच्छ आहे की नाही , हे देखील या निमित्ताने तपासता येणार आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply