सुप्रीम कोर्टाकडून 12 आमदारांचे निलंबन झाले रद्द.

शेअर करा.

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेमधिल भाजपच्या १२ आमदारांचे एक वर्षाकरीता केलेले निलंबन रद्दबातल करण्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी जाहीर केला .

 

निलंबनाचा निर्णय घटनाबाह्य आणि अतार्किक असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारलेले आहे . सर्वोच्च न्यायालयाचे न्या . अजय खानविलकर यांच्या नेतृत्त्वाखालील व न्या . दिनेश माहेश्वरी न्या सी . टी रविकुमार यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने हा निकाल दिलेला असल्याचे न्यायालयाने सांगितले की , महाराष्ट्र विधानसभेतील १२ आमदारांचे एक वर्षा करिता निलंबन केलेले बेकायदेशीर आहे .

 

मुळात विधानसभेच्या अधिवेशनापेक्षा अधिक कालावधीसाठी आमदारांचे निलंबन करणे हेच घटनाबाह्य आहे . ही कारवाई हकालपट्टीपेक्षा देखील वाईट आहे . या निर्णयाचे परिणाम खूपच भयानक आहेत सभागृहात प्रतिनिधीत्व राखण्याच्या मतदारसंघाच्या हक्कावर त्यामुळे गदा आली आहे

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply