सोनवद : रोड वरील स्मशाभभूमी आहे . त्या ठिकाणी असणारी एक खोली नेहमी कुलूप लावून बंद दिसते . यादरम्यान अंत्यसंस्काराकरिता काही वस्तू असतील यासाठी याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत असत . यादरम्यान सोमवारी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी एका अज्ञात व्यक्तीने खोलीचे कूलूप तोडून आत बघितले असता खोलीत दारूच्या बाटल्या , गादी, तांब्या , ताट,कंडोमचे पाकिट , तेलाचे डबे , ग्लास , एका पिशवीत कांदे , इतर पदार्थ व काही दुचाकी गांड्याच्या नंबरे प्लेटा आढळून आल्या .
यामुळे हा प्रकार काय आहे याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही . दरम्यान या ठिकाणी काहीसे गैरप्रकार किंवा कुणी वस्तव्याला तर राहत नसेल असे ना याप्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत . दरम्यान या खोलीची किल्ली कुणाकडे आहे हे देखील समोर आलेले नाही . कारण स्मशानभूमी समान्य असा व्यक्ती दिवसादेखील जाण्यास घाबरत असतो परंतू याठिकाणी संसारासाठी उपयुक्त अशा वस्तू घेवून कोण वास्तव्यात आहे यांची गावभर चर्चा सुरू आहे .
अद्यापर्यंत शहरात जरी चर्चा झाली तरी देखील धरणगाव नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी अद्यापपर्यंत स्मशानभूमीत धाव घेतली नसल्याचे कळाले नाही .