• Tue. Aug 16th, 2022

  सोन्याच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ, धनत्रयोदशी , लक्ष्मीपूजन यामुळे सोन्यामध्ये मोठी उलाढाल.

  ByKhandeshTimes

  Nov 4, 2021

  मुंबई : सोने व दिवाळी यांचे जवळचे संबंध आहेत. धनत्रयोदशी , लक्ष्मीपूजन यासारख्या शुभ दिवशी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते . त्याचबरोबर दिवाळीच्या निमित्ताने सोन्यामध्ये मोठी उलाढाल होताना दिसून येते . यावर्षी त्या मानाने कमी असलेले सोन्याचे दर व आगामी लग्नसराईमुळे मोठ्या प्रमाणात वाढलेली मागणी याचा परिणाम म्हणून दिवाळीमध्ये सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे . कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता मार्च , २०२० मध्ये केलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका सराफ व द बनविण्याच्या व्यवसायाला बसलेला आहे . गेल्या वर्षाच्या दिवाळीमध्ये कोरोनाचे निर्बंध हे चांगल्याच प्रमाणात कायम असल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी झाली नव्हती . परंतु गेल्या काही महिन्यांपासून अर्थव्यवस्था परत रुळावर येत असल्याचे मिळत असलेले संकेत शक्यता दिसत आहे .

  कोरोनाचे जवळपास सर्व निर्बंध यामुळे या वर्षाची दिवाळी मोठ्या प्रमाणात सोने खरेदीची शक्यता आहे . कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून विवाह स्थगित झालेले आहेत . ते या पुढे येणाऱ्या काळामध्ये होणार असल्यामुळे दागिन्यांची खरेदीमध्ये वाढ होऊ शकते . कोरोनाच्या लसीकरणाचा वाढत असलेला वेग आणि कमी होत असलेली रुग्णसंख्या विचारात घेता सरकारने देखील निर्बंध कमी केले आहेत . याचप्रमाणे खाली आलेल्या सोन्याच्या दरांमुळेही खरेदीकरीता ग्राहक पुढे येण्याची तयारी दर्शवत आहे

  Leave a Reply

  Your email address will not be published.