सोशल मीडियाचा दुरपयोग : महिलेच्या नावाने सोशल मीडियावर अश्लील फोटो.

शेअर करा.

जळगाव : अलीकडे सायबर क्राईमच्या संदर्भातील गुन्हे वाढत असताना इंस्टाग्राम या सोशल मीडिया साईडवर एका महिलेच्या नावे बनावट खाते तयार करुन त्या प्रोफाईलवर महिलेचा फोटो अपलोड करत या खात्यावर अश्लील फोटो शेअर केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे . चाळीसगाव शहरातील २७ वर्षीय महिलेच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे . 30 ऑगस्ट रोजी रात्री हे अश्लील फोटो या महिलेच्या बनावट खात्यावर पोस्ट करण्यात आले . या महिलेने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली . त्यानुसार अब्रु नुकसान व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे . त्यामुळे याचा तपास सुरु आहे.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply