• Tue. Aug 16th, 2022

  हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग : २० दरवाजे उघडले.

  जळगाव : हतनूर धरणाच्या लाभ क्षेत्रात व मध्य प्रदेशात तापी नदी क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणीपातळीत यंदा वाढ झाली आहे . त्यामुळे हतनूर प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडून ४८ हजार २०४ क्यूसेकचा विसर्ग केला जात होता . शनिवारी ( ता . २१ ) सकाळी प्रकल्पाचे २० दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून ६० हजार ६७१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे . जिल्ह्यातील गिरणा नदीक्षेत्र River ) परिसरात देखील सुरू असलेल्या पावसामुळे गेल्या चोवीस तासात गिरणा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात ४.६७ दलघमी पाण्याची आवक झाली आहे .

  जवळपास दहा ते पंधरा दिवसांनंतर पावसाचे दमदार पुनरागमन झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांत काही प्रमाणात आवक झाली आहे . तापी नदीवरील हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत ३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून , ९ ६.४८ दलघमी पाण्याची आवक झाली आहे . परिणामी , पाणीपातळीत वाढ झाल्याने हतनूर प्रकल्पाचे २० गेट उघडून ५८ हजार ६७५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात केला जात आहे .

  चोवीस तासांत ३८ मिलिमीटर पाऊसगिरणा प्रकल्पात जुलैअखेरीस ३५ टक्के उपयुक्त जलसाठा होता . गिरणा नदीक्षेत्र व प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत ३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने ४.६७ दलघमी पाण्याची आवक झाली असून , सद्यस्थितीत गिरणा प्रकल्पात ४२.६४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे .

  Leave a Reply

  Your email address will not be published.