हिंदू जनजागृती समिती : मुक्त विद्यापीठाने ज्योतिष विषय सुरू करण्याचा निर्णयावर ठाम रहावे.

भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण प्राचीन विद्या म्हणून ज्योतिष विद्या प्रसिद्ध आहे . इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत ज्योतिष शास्त्र विषय सुरू करण्याचा निर्णय उत्तम असून , तो बदलवू नये अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली . आधुनिक विज्ञान सोडवू शकत नाही , अशा अनेक व्यक्तिगत अडचणींसंदर्भात ज्योतिषशास्त्र योग्य दिशादर्शन करते . समाजाला ज्योतिषशास्त्राची गरज आहे ज्योतिषशास्त्रात आहे म्हणूनच ते सहस्र वर्षे टिकले आहे काही थोड्या लोकांनी ज्योतिषाला विरोध केला म्हणजे विज्ञान युगात ज्योतिष थोतांड ठरत नाही , हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही दिला आहे . म्हणून ज्योतिषशास्त्र हा विषय विद्यापीठात सुरू करावा , अशी मागणी केली आहे . प्रा . डॉ . सतीश बागुल , राहुल मराठे , उज्ज्वल राजपूत , चंद्रकांत भोई आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published.