हृदयविकाराने झाला बस चालकाचा मृत्यू ,धुळ्यातील घटना वाचा संपूर्ण बातमी

शेअर करा.

न्याहळोद , धुळे : सुरतला रवाना झालेले बसचालक दीपक शिवदास रायते ( वय ४७ ) यांना बुधवारच्या सकाळी धुळे आगारातच हृदयविकाराचा तीव्र असा झटका आला . तात्काळ त्यांना कर्मचाऱ्यांनी शासकीय रुग्णालया मध्ये दाखल केले असता , डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले .धुळे आगारात ते चालक म्हणून कार्य करत होते . ते सकाळी ५.३० वाजेला न्याहळोदहून धुळे आगारात आले . त्यांची पुढील ड्यूटी ही सुरतसाठी लावण्यात आलेली होती .

कंट्रोल केबिनला ते नंबर टाकण्याकरिता गेले होते . त्याच ठिकाणी त्यांना तीव्र असा रुदय विकाराचा झटका आला . त्यांना परिवहन महामंडळात कार्यरत असणारे कर्मचाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले . परंतु , त्याचे उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत असे घोषित केले . चालकाच्या मृत्यूचे वृत्त कळाले असून देखील अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले नव्हते, असे काही कर्मचाऱ्यांचे सांगणे आहे . त्यांच्या पश्चात आता आईवडील , पत्नी , व त्यांची दोन मुले आहेत . त्यांना हृदयाचा कोणताही त्रास नसल्याचे तसेच , स्वस्तय देखील चांगली होती असे त्याचे चुलत भाऊ कल्पेश रायते यांनी कळविले आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply