जादा वेतनाची परतफेड करण्याच्या नोटीस संदर्भात जिल्हा परिषदेला अनुकूल अहवाल पाठवायच्या बदल्यात दोन हजाराची लाच घेताना कंडारी बुद्रक ता.धरणगाव येथील ग्रामसेवक कृष्णकांत राजाराम सपकाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दुपारी चोपडा नजीक एका हॉटेलमधून त्यांना पकडण्यात यश आले.
कंडारी बुद्रुक येथे शिपाई म्हणुन नोकरीस असलेल्या तक्रारदाराला सन – २०१५-१६ या वित्तीय वर्षात जादा वेतन दिले गेले होते . सदर जादा देण्यात आलेली रक्कमेची परतफेड करणेबाबत तक्रारदार यांना नोटीस आल्याने त्या नोटीसचा अनुकूल अहवाल जिल्हा परीषद , जळगाव येथे पाठविण्याच्या मोबदल्यात त्यांना दि .२८ रोजी लाच मागण्यात आली होती.या संदर्भात सोमवारी ग्रामसेवक कृष्णकांत सपकाळे यांनी हॉटेल मानसी , चोपडा येथे पंचासमक्ष १ हजारांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली .
तसेच याप्रकरणी धरणगाव पंचायत समितीचा विस्तार अधिकारी सुरेश कठाडे यालाही या प्रकरणात अटक करण्यात आली असून त्यातील हजार रुपये हे सुरेश कठाळे यांच्यासाठी होते