११ वीची उद्यापासून ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया होणार सुरु.

धुळे : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये सन २०२१- २२ या शैक्षणिक वर्षासाठी अकरावीची प्रवेश प्रक्रिया २० ऑगस्टपासून ऑफलाइन पद्धतीने राबविण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी दिलेल्या आहेत . जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्यांच्या बैठकीला शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी , पुष्पलता पाटील , दिनेश देवरे , शिक्षणाधिकारी एस.जी. निर्मल , सहायक शिक्षण उपनिरीक्षक महेंद्र जोशी , तालुका प्रतिनिधी शरद भामरे , योगेश नांद्रे , पंजाबराव व्यास , गोकुळ पाटील . तुषार साळुखे , मुख्याध्यापिका मनीषा जोशी आदी सहभागी झाले होते . या वेळी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी प्रवेशप्रक्रिया कशी राबवावी याची माहिती दिली . तसेच शंकांचे निरसन केले . प्रवेशप्रक्रियेविषयी दिलेल्या सूचनांचे पालन करावे , अशी सूचना त्यांनी केली . दरम्यान , प्रवेशप्रक्रिया २० ऑगस्टपासून सुरू होणार असली तरी शहरातील काही नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे .
दरम्यान यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या . अंतर्गत मुल्यमापनावर आधिारतच निकाल जाहीर करण्यात आला . जिल्ह्यातून जवळपास २८ हजार ५६१ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून , जागा केवळ २७ हजारच आहे . त्यामुळे प्रवेश मिळवितांना विद्यार्थ्यांना कसरत करावी लागणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.