नवी दिल्ली : आतापर्यंत देशामधील ८० कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लस दिल्या गेल्या असून , या या महिन्याच्या शेवटी ही आकडेवारी १०० कोटीला पोहोचलेली असेल . यामुळे १ ऑक्टोबरपासून १२ ते १७ वर्षातील मुलांना लसीचा प्रथम डोस देण्याची घोषणा केंद्र सरकार लवकरात लवकर करेल , हे सांगितले जात आहे . देशात सुमारे ४४ कोटी संख्या१८ वर्षांखालील मुलांची आहे . यामधील १२ ते १७ या वयोगटातील मुलांना प्राधान्यक्रम देत लस देण्याची तयारी सरकारने सुरू करण्यात आली आहे . इन्सॅकॉग ( सार्स व कोविड संबंधीची देशातील सर्वोच्च सरकारी संस्था ) तसेच कोविड टास्क फोर्स च्या अध्यक्षपदी असणारे प्रा . एन . के अरोरा यांनी सांगितले की या वयोगटातील मुलांद्वारे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता जास्तीची असल्याने त्यांचे लसीकरण प्राधान्याने केले जाईल .
लहान मुलांमध्ये कोरोनाचा अधिक प्रमाणात संसर्ग झालेला नसल्याचे आतापर्यंतच्या सिरो स . मधूनआढळून आले आहे . परंतु प्रौंडातील मोठ्या वर्गाचे लसीकरण झाले असल्याने १२ ते १७ वयोगटातील मुलांना आधी लस देण्याचा विचार आहे .काहीना काही व्याधी असलेल्या तसेच या प्रकारच्या व्याधींची शक्यता असणार मुलांना प्रथमतः लस देण्यात येईल , असे प्रा . अरोरा म्हणाले . एका प्रश्नाच्या उत्तरात ते सांगतात की , एरवीही लहान मुलांमध्ये मोठे आजार व त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक नसते. त्यामुळे त्यांच्या ऐवजी पालकांच्या सुरक्षेकडे आधी लक्ष देण्यात आले . त्यांचे लसीकरण आधी सुरू झाले .