१५७ माशांची १.33 कोटींत विक्री मासे होते दुर्मिळ घोळ जातीचे.

शेअर करा.

पालघरचे मच्छीमारी च्या व्यावसायिक चंद्रकांत तरे हे एका रात्रीत कोट्यधीचे मालक बनले आहे . ७ सहकाऱ्यांसोबत मासेमारीसाठी करण्यासाठी चंद्रकांत यांचे पुत्र सोमनाथ यांनी जाळे फेकल्या बरोबर ‘ सी गोल्ड ‘ नावाने प्रख्यात असी दुर्मिळ घोळ मासोळी त्यात अडकून पडलेली . एकदोन नसून तब्बल १५७ घोळ मासे एकाच वेळी जाळ्यात गावले . पालघर बाजारातील लिलावात या सर्व माशांची १.३३ कोटी रुपयांत विक्री झाली आहे .

 

सोमनाथन यांनी सांगितले , आपण प्रत्येकी एका माशाची सुमारे ८५ हजार रुपयांना विक्री केली.यूपी व बिहारच्या मधल्या व्यापाऱ्यांनी हे मासे खरेदी केले असून . घोळ माशाचे Scientific नाव ‘ प्रोटोनिबिआ डायकॅथस ‘ असे आहे . त्याचा वापर औषधे आणि कॉस्मेटिक्स तयार करण्यात केला जातो . थायलंड , इंडोनेशिया तसेच जपान व इतर देशांत त्याला खूप मोठया प्रमाणावर मागणी असते.सर्जरीमध्ये वापरले जाणारे व आपोआप विरघळणारे धागे याच माशापासून तयार करतात . यापूर्वी गुजरातच्या मासेमारांना ११ हजार घोळ मासोळ्या सापडल्या होत्या .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply