१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बापाने केला लैंगिक अत्याचार.

शेअर करा.

औरंगाबाद : वडील व मुलीच्या नात्याला काळीक फासणारी धक्कादायक असा प्रकार औरंगाबाद शहरातील वाळूज .

परिसरात घडला . १५ वर्षीय असणाऱ्याअल्पवयीन मुलीवर नराधम बापानेच अत्याचार केल्याची घटना घडलीअसल्याचे समोर आले आहे .

 

इवढेच नव्हे तर याबाबत विचारणा करत असणाऱ्या पत्नीला सुद्धा या नराधमाने मारहाण केली . याप्रकरणी वाळूज पोलीस स्टेशनला बाळ लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . मिळालेल्या माहितीप्रमाणे , वाळूज पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात राहणारा नराधम मागील पाच महिने आपल्या १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता . तर ०१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता पुन्हा एकदा मुलीवर या नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असतांना . तसेच याबाबत आईला किंवा भावाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली . त्यामुळे मुलगी प्रचंड घाबरली होती .

 

यानंतर हा सर्व प्रकार मुलीच्या आईला कळाला असता तिने आपल्या पतीला याबाबत विचारणा केली . परंतु या नराधमाने पत्नीला देखील मारहाण करत तिच्या डोक्यात परशीचा तुकडा मारला . ज्यात फर्यादी महिला हि जखमी झाली . त्यानंतर महिलेने वाळूज पोलीस ठाणे गाठत पोलिसांना सर्व हकीकत क कळविली व पतीविरोधात गुन्हा दाखल केला . याप्रकरणी वाळूज पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार कायद्याअनुसार गुन्हा दाखल केला असून , आरोपीला सुद्धा अटक केली आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply