१७ दिवसांनंतर पाऊस

शेअर करा.

जळगाव : १७ दिवसांपासून पाठ फिरवलेल्या वरुणराजाने सोमवारी जळगाव शहरात रिमझिम का असेना मात्र काही वेळ हजेरी लावली . शहराव्यतिरिक्त तालुक्यातील शिरसोली , आव्हाणे , ममुराबाद , आसोदा , कानळदा , भादली परिसरात चांगली हजेरी लावली .१७ दिवसांच्या मोठ्या खंडानंतर शहरात पावसाचे पुनरागमन झाले असून , आठवडाभरात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे . तसेच २० पासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे . यंदा ३० जुलैपासून शहरात पावसाने पाठ फिरविली होती . सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास १० ते १५ मिनिटे पावसाने हजेरी लावली .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply