१७ वर्षीय मुलांचा पोहताना गिरणा नदीत बुडून मृत्यू.

शेअर करा.

पाचोरा : आपल्या मित्रांबरोबर पोहण्याकरिता गेलेल्या एका १७ वर्षीय मुलाचा गिरणा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी समोर आली आहे . हर्षल संजय तावडे ( वय -१७ ) रा . नांद्रा ता . पाचोरा हे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे . या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असल्याचे दिसत आहे .

 

२ जानेवारी रविवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मित्रांबरोबर माहेजी या ठिकाणी गिरणा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेला . पोहत असतांना त्याला पाण्याचा पुरेपूर असा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची कळाले आहे . या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच . परिसरातील नागरीकांना तात्काळ त्या दिशेने धाव घेतली . हनुमंतखेडा येथील नावेकरांनी त्या मुलाचा शोधा घेवून मुलाचा मृतदेह नदीतून बाहेर आणला . याबाबत पोलीसात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आली नाही .

 

मयत हर्षल हा विद्यार्थी दहावी पास करून जळगाव या ठिकाण बबनभाऊ बाहेती या महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला होता . संजय अवचीत तावडे यांना २ मुले होती . हर्षल हा दोघां मध्ये लहान होता . वडीलांचा शेतीचा व्यवसाय असून अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या या शाळकरी मुलांचा अश्या दुर्दैवी मृत्यूने पूर्ण गावावर अत्यंत दुखावले गेले आहेत . हर्षल हा अभ्यासामध्ये अत्यंत हुशार होता . अशी माहिती नातेवाईकांकडून प्राप्त झालेली आहे

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply