• Tue. Aug 16th, 2022

  १८ वर्षीय तरुण बीटकॉइनच्या साह्याने आज 50 कोटीचा आहे मालक वाचा सविस्तर बातमी.

  ByKhandeshTimes

  Oct 24, 2021

  जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी बनलेल्या बिटकॉईनमुळे आतापर्यंत अनेक लोकांना लखपती बनवले आहे . यामध्येच आता सर्वात कमी वयाच्या म्हणजेच १८ वर्ष असलेल्या तरुणाला बिटकॉइन ने करोडपती बनविले आहे , या कमी वयाच्या करोडपती बनलेल्या तरुणाचे नाव एरिक फिनमॅन असे आहे .

   

  एरिक फिनमनने या तरुणाने सन 2011 ला वयाच्या 11 व्या वर्षी पहिल्या बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्याचे कळाले आहे .त्या काळात एका बिटकॉइनची किंमत ही 5 12 होती . 11 वर्षीय असलेल्या एरिकने त्याच्या आजीकडून $ 1000 उधार घेऊन त्याच्या भावाच्या सहाय्याने त्याने बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली असता एरिकने 100 बिटकॉईन विकत घेतलेले होते . नंतर दोन वर्षांत 2013 मध्ये बिटकॉइनची किंमत ही जवळपास $ 1,200 पर्यंत पोहोचल्याने एरिकने याने फक्त दोन वर्षांमध्ये बिटकॉइनच्या माध्यमातून मोठा अनपेक्षित असा नफा कमावला होता . एरिक फिनमॅन हा वयाच्या 18 व्या वर्षी बिटकॉइनसह लक्षाधीश झाला आहे, व आज 10 वर्षांनंतर , बिटकॉइन ही क्रिप्टोकरन्सी 50 लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याने एरिक याच्या होल्डिंगची किंमत 50 कोटी इतक्या रुपयांवर पोहोचली आहे .

  Leave a Reply

  Your email address will not be published.