• Tue. Aug 16th, 2022

    १ ली पासूनच्या सर्व शाळा ह्या येत्या १० ते १५ दिवसांत सुरू होणार.

    ByKhandeshTimes

    Nov 17, 2021

    मुंबई : covid-19 मुळे मागिल दीड वर्षांपासून बंद असणाऱ्या १ पहिलीच्या वर्गा पासून पुढील वर्गाची शाळा सुरु करण्यासंबंधित संकेत मिळाले असून लवकरात लवकर शाळा सुरु होणे अपेक्षित आहे .

     

    राज्यांमधील ग्रामीण भागांसोबत शहरांतील १ ली पासूनच्या सर्व शाळा ह्या येत्या १० ते १५ दिवसांत सुरू होण्याचे संकेत दिसली आहेत . याबाबत कोरोना कृती दल व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मान्यतेनंतर याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे कळाले आहे .

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये सर्व शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक अशी चर्चा झाली असून यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्यासोबत संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते .

    Leave a Reply

    Your email address will not be published.