इंडियन पोस्ट पेमेंट या बँकेकडून संपूर्ण देशात रिक्त जागांवर भरती केली जाणार आहेत . याकरिता पदा प्रमाणे ९ ४,००० / – रुपये ते २ , ९ २,००० / – रुपये पगार देऊ केला जाईल . या भरतीसाठी उमेदवारांना २३ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीच्या माध्यमाने अर्ज करता येणार आहे .
१ ) व्यवस्थापक ( Admin ) ,
२ ) वरिष्ठ व्यवस्थापक ( Senior Manager ) ,
३ ) मुख्य व्यवस्थापक ( Chief Manager ) ,
४ ) महाव्यवस्थापक ( General Manager ),
५ ) सहाय्यक व्यवस्थापक ( Assistant Manager ) ,
६ ) उपव्यवस्थापक ( Deputy Manager )
शैक्षणिक आर्हता :
याकरिता उमेदवारांकडे इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी / कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंग डिग्री / एमबीए / पदव्युत्तर पदवी / सेल्स / मार्केटिंग मध्ये एमबीए / पदवीधर हे शिक्षण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा :
व्यवस्थापक पदाकरिता २३ ते ३५ वर्षे , वरिष्ठ व्यवस्थापक – २६ ते ३५ वर्षे , मुख्य व्यवस्थापक – २ ९ ते ४५ वर्षे , उपव्यवस्थापक – ३२ ते ४५ वर्षे , सहाय्यक व्यवस्थापक – ३५ ते ५५ वर्षे , महाव्यवस्थापक – ३८ ते ५५ वर्षे वयोमर्यादा – ठरविल्या गेल्या आहे . २३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ही वयोमर्यादा मोजणी होणार आहे . एससी / उमेदवारांना ०५ वर्षे तर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षे ३ सवलत देण्यात येणार आहे .
अर्ज शुल्क :
खुल्या गटातील उमेदवारांना ७५० / – रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार असून आरक्षित वर्गासाठी १५० / रुपये शुल्क आकारले जाईल . उमेदवारांना त्यांच्या पदानुसार ९ ४,००० / – रुपये ते २ , ९ २,००० / – रुपये पगार हा दिला जाईल . तसेच निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात रिक्त जागांवर पोस्टिंग दिल्या जातील .
अंतिम तारीख :
या पदांसाठी २३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अधिकृत संकेत स्थळावर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करावयाचा आहे . या तारखेनंतर आलेल्या अर्जांचा ग्राह्य धरले जाणार नाही . अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे . अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज हा बाद केला जाऊ शकतो .