३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण होणार सुरू, जाणून घ्या सविस्तर बातमी.

नवी दिल्ली: संपूर्ण देशामध्ये ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही, पसरत असणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन करतानाच पंतप्रधान मोदी यांनी नवीन वर्षात ३ जानेवारीपासून १५ ते १८ या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु करण्याची येणार असल्याची घोषणा शनिवारी केली .

देशवासीयांना दूरचित्रवाणीवरून संबोधित करत असताना त्यांनी १० जानेवारीपासून ६० वर्षाहून अधिक वय असणाऱ्यांना कोरोनाविरोधात दक्षता मात्रा ( प्रीकॉशन डोस ) देण्यात येणार असल्याची देखील घोषणा केली . दोन लसींमधील अंतर हे नेमके किती असावे , कोरोना झालेल्यांनी लोकांनी लस नेमकी कधी घ्यावी , हे वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनानंतर निश्चित करण्यात आलेले आहे .

आरोग्य सेवकांनी केलेले कठीण स्वरूपाचे प्रयत्न व लोकांची विज्ञानावरील श्रद्धा यामुळेच भारतात जगातला सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम आपण राबवू शकला , हे देखील मोदींनी यावेळेस कळवले .

Leave a Reply

Your email address will not be published.