४४ कोटीची रक्कम जनधन योजने मध्ये समाविष्ट.

शेअर करा.

नवी दिल्ली : साडेसात वर्षा आधी केंद्र सरकारने सुरू केलेल्या जनधन योजनेंतर्गत खात्यांतील रक्कम ही तब्बल १.५ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झालेली आहे . अर्थ मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारी प्रमाणे या खात्यांची संख्या ४४.२३ कोटींवर गेलेली आहे .

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जनधन खात्यांची घोषणा केली होती . अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार , एकूण ४४.२३ कोटी जनधन खात्यांपैकी ३४.९ कोटी खाती सरकारी बँकांमध्ये व ८.०५ कोटी खाती ग्रामीण बँकांमध्ये आहेत . तर १.२८ कोटी खाती प्रायव्हेट क्षेत्रातील बँकांमध्ये उघडण्यात आलेले आहेत .

याच्यासह ३१.२८ कोटी लाभार्थ्यांना रुपे कार्ड देण्यात आलेले आहे . रुपे कार्डचा वापरही मागील काही वर्षात अर्थ मंत्रालयाने वाढल्याचे सांगितले आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply