६१ हजारांचा Solar प्रकल्पातील मुद्देमाल चोरट्यांनी केला गायब

धुळे : साक्री तालुक्यामधील भामेर शिवारातील सौर ऊर्जा प्रकल्पातील एका प्लॅनमधील केबल वायर , प्लेटा , प्लग हे विविध ६१ हजारांचा मुद्देमाल चोरून घेऊन गेल्याची घटना घडली . चोरीचा हा प्रकार ६ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडल होता . याप्रकरणा संबंधित ११ डिसेंबर रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल करण्यात आली . साक्री तालुक्यातील भामेर शिवारात ५० मेगावॅटचा सोलर प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे . या प्लॅनच्या ब्लॉक नंबर ३१ मध्ये आणि ब्लॉक नंबर २१ मध्ये चोरट्याने शिताफीने हातसफाई केली असल्याचे कळाले आहे . चोरट्याने केबल वायर , प्लग , सोलर प्लेटाचे कनेक्टिंग प्लंग कापून नुकसान करत चोरट्यांनी चोरुन नेले . चोरीला गेलेला मुद्देमाल हा ६१ हजार रुपये किमतीचा आहे .

ही घटना ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडलेली होती . सकाळी ही बाब प्रकर्षाने समोर आल्याने चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्नाना सुरुवात करण्यात आला परंतु , त्याचा काही उपयोग न झाल्याने निजामपूर येथील मनोज रामदास पगार ( ५२ ) यांनी निजामपूर पोलीस स्टेशनला ११ डिसेंबर रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केलेली होती . त्याप्रमाणे , चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला . सहायक पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ घटनेचा तपास करीत असल्याचे कळाले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.