६३ हजार शेतकरी बांधवांना कर्जमुक्त योजनेचा लाभ प्राप्त झाला नाही काय आहे सरकारची योजना.

गोंदिया : राज्यामधिल महाविकास आघाडी सरकारने सन (२०१ ९) मध्ये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती या योजनेंतर्गत २ लाखापर्यंतची कर्जमुक्ती जाहीर करण्यात आलेली होती . परंतु या योजनेसाठी पात्र ठरलेल्या अनेक शेतकऱ्यांचे आधारकार्ड हे बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यांमधील जवळपास ६३ हजार ५१७ शेतकरी कर्जमुक्तीपासून या योजने पासून वंचित असल्याचे कळाले आहे .

 

यामध्ये सर्वात जास्त शेतकरी हे परभणी , यवतमाळ , अहमदनगर , बुलडाणा जिल्ह्यामधील आहेत . महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत राज्यातील ३२ लाख ५२ हजार शेतकरी पात्र झालेले होते . यापैकी गेल्या दोन वर्षांत ३१ लाख ८८ हजार ४ ९ २ इतक्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला असून. तब्बल दोन हजार कोटी रुपयांहून जास्त रक्कम पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले गेले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.