६५ वर्षीय महिला घरच्या वरील मजल्यावरून आदळली खाली काय झाला प्रकार?

शेअर करा.

धुळे : जोरदार वेगाने येणाऱ्या एका वानराने वृद्ध महिलेला प्रचंड वेगाने धक्का दिला . ती वरील मजल्यावरून खाली पडली . गंभीर स्वरूपाने जखमी झाल्याने रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला ही संपूर्ण घटना शनिवारचा सकाळी घडली. चंद्रकला संतोष पाटील हि ६५ वर्षाच्या वृद्ध महिला घराच्या वरच्या मजल्यावर काही कामासत्व गेली होती . गॅलरीमध्ये ही महिला उभी असतानाच्या वेळी जवळच्या झाडावर एक वानर बसलेले होते . त्या वानराने मोठ्याने झडप भारत ही वृद्ध महिला उभ्या असलेल्या गॅलरी वर ते दाखल झाले व त्या वृद्धेला जोरदार असा धक्का . सावध नसलेल ही वृद्ध महिला प्रथम मजल्यावरून खाली आदळली .

याचा जोरदार असा आवाज झाल्याने घरातील मंडळी सोबत परिसरातील नागरिकांनी घरच्या दिशेने धाव घेतली . या महिलेच्या हाता पाया सोबत डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली होती . रक्तस्रावदेखील प्रचंड प्रमाणावर झाला होता . घटनेचे गांभीर्य ओळखून या महिलेला तात्काळ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . उपचार सुरू असताना रुग्णालयातील डॉक्टरांनी महिलेला मृत असे घोषित केले.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply