७ कोटी रुपयांच्या नकली नोटा केल्या जप्त, मार्केटमध्ये पसरवणारा होते नकली नोटा.

शेअर करा.

मुंबई : मुंबई येथील दहिसर परिसरात दोन हजार रुपयाच्या बनावट स्वरूपाच्या नोटांचा संपूर्ण साठा पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी एका रॅकेटचा पर्दाफाश केला गेला आहे . ७ कोटी रुपयांच्या नोटा मुंबईच्या बाजारामध्ये चलनात आणण्याकरिता या रॅकेटने प्लॅन केला होता , दोन हजाराचे चलन मार्केटला चलनात आणण्यापूर्वीच क्राईम ब्रँच पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केल्याने मोठी खळबळ उडाली आहे . मुंबईत प्रथमतच मोठ्या प्रमाणात बनावट अशा नोटांचे एवढे चलन पकडण्यात आलेले आहे .

 

क्राईम ब्रांच च्या पोलिसांनी या रॅकेटचा डाव उधळून लावून कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण सात आरोपींना ताब्यात घेतलेले आहे , ही एक आंतरराष्ट्रीय टोळी असल्याची माहिती प्राप्त झाले आहे . या आरोपींकडून ७ मोबाईल व एक लॅपटॉप जप्त करण्यात आलेले आहे . या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हे करत आहे .

 

धक्कादायक संगणक इंजिनिअर असलेल्या औरंगाबादच्या युवकाचा नोटा छापण्याचा मोठा कारखाना संगणक इंजिनिअर असलेल्या औरंगाबादच्या या इंजिनिअरने लवकरात श्रीमंत होण्यासाठी बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू केलेला होता . धक्कादायक असे की , याआधी देखील बनावट नोटा छापल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक करण्यात आले होती . तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर देखील झटपट श्रीमंत होण्याकरिता बनावट नोटा छापण्यास सुरुवात केलेली होती . कारागृहातून सुटल्यावर देखील आपल्या मित्रा बरोबर बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला होता .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply