९ .८१ कोटी डॉलरची हॉटेल अंबानींच्या खिशात, न्यूयार्क मधील सर्वात आलीशान हॉटेल.

शेअर करा.

नवी दिल्ली : देशांमधील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने शनिवारी न्यूयॉर्कमधल्या प्रतिष्ठित आलिशान हॉटेल मँडरिन ओरिएंटल विकत हे घेतले आहे . या हॉटेलची किंमत ९ .८१ कोटी डॉलर ( जवळपास ७२ ९ कोटी रुपये ) इतकी असून हे हॉटेल बॉलरूम पंचतारांकित स्पा व खाण्यापिण्याकरीता सर्वोत्तम ठिकाण म्हणून ओळखले जाते .

 

या हॉटेलमध्ये एका रात्रीचे खोलीभाडे तब्बल १० लाख रुपयांपेक्षा जास्तीचे आहे . अनेक अभिनेते , अभिनेत्रींसह मोठे राजकीय नेते या हॉटेलमध्ये मूककामाकरिता असतात ८० कोलंबस सर्कलजवळ मँडरिन ओरिएंटल हॉटेल २००३ मध्ये तयार करण्यात आलेली आहे .

 

या हॉटेलमध्ये २४८ रुम आहेत . रिलायन्सने कोलंबस सेंटर कॉर्पोरेशनशी हॉटेल घेण्यासाठी करार केलेला आहे . एका वर्षापेक्षा देखील कमी काळात रिलायन्सने हे दुसरे हॉटेल आपल्या ताब्यात घेतले आहे . मागील वर्षी ७ एप्रिल रोजी रिलायन्सने लंडनमध्ये स्टोक पार्क लिमिटेडचा ताबा घेतला आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply