1 तारखेपासून सुरू होणार शाळा राज्य सरकारने घेतला निर्णय, अशा राहणार नियमवली.

मुंबई : राज्यातील शाळा सुरु होण्याबाबत आज शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी नुकतीच घोषणा केली आहे . राज्यातील सर्व शाळा या एक डिसेंबरपासून सुरु होणार असल्याचे वर्ष गायकवाड यांनी सांगितले . याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून पहिली ते दहावीचे वर्ग सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले .

शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला . यावेळी त्या म्हणाल्या की , कोरोना संक्रमणामुळे आणि लॉकडाऊनमुळे गेली दीड वर्षाहून अधिक काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता . आज शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी शाळा पुन्हा सुरु करणार असल्याबाबत घोषणा केली . त्यामुळे आता शाळा न पाहिलेल्या चिमुकल्यांना आता शाळेत जाता येणार आहे . पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता इयत्ता पहिली ते चौथीचे वर्गही ऑफलाइन सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे . मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले . तत्पूर्वी या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाने परवानगी दिली होती . राज्याच्या कोविड टाक्स फोर्सनेही पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्याबाबत हिरवा कंदिल दाखवला होता . राज्यात कोविड- १ ९ संक्रमणग्रस्तांची संख्या गेले काही महिने सातत्याने कमी होत आहे . परिणामी परिस्थिती सामान्य होत असल्याने राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करत आणले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published.