खान्देशगुन्हेजळगांव

वृद्धेची सोनपोत ओढून चोरी; दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

वृद्धेची सोनपोत ओढून चोरी; दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : मंदिरातून घरी परतणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोनपोत दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी जबरीने ओढून नेली. ही घटना दि. २६ रोजी रात्री सुमारास सात वाजता टिळक नगरातील प्रतीक क्लासेससमोरील गल्लीत घडली.

सुखदा मयुरेश्वर कॉलनीतील शारदा अर्जुनराव जाधव (वय ७६) या मंदिरातून घरी परतत असताना दुचाकीवरील चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनपोत हिसकावली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे त्यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.

घटनेची माहिती मिळताच जाधव यांच्या कुटुंबीयांनी तातडीने तालुका पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून सपोनि अनंत अहीरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button