
श्रीरामदेवबाबा सांगता सोहळ्यानिमित्त गुरुनानक नगरात भंडाऱ्याचे आयोजन
जळगाव प्रतिनिधी – गुरुनानक नगरातील ममूराबाद रस्त्यावरील हनुमान मंदिरात आज दि. २ सप्टेंबर रोजी श्रीरामदेवबाबा सांगता सोहळ्याच्या निमित्ताने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दुपारी १२ वाजता श्रीरामदेवबाबाची आरती करून करण्यात आली. ही आरती शिवचरणढंडोरे, शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक कावेरी कमलाकर व पोलिस कर्मचारी योगेश साळवे यांच्या हस्ते संपन्न झाली.
आरतीनंतर भंडाऱ्याला सुरुवात करण्यात आली. या वेळी प्रेम पवार, कन्हैया जाधव, नंदलाल गोडाले, राजेश चावरिया, रामभैया पवार, पवन जाधव, कुणाल पवार, राहुल पवार, वीनू पवार, अॅड. विशाल रील, शुभम पवार, अजय अटवाल, सोनू चिरावंडे यांसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. या आयोजनामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.





