खान्देशगुन्हेजळगांव

धक्कादायक : नकाब देण्याच्या आमिषाने सावदा येथे शाळेत 13 वर्षीय मुलीचा विनयभंग

सावदा ;- शहरातील एका शाळेमध्ये १३ वर्षीय विद्यार्थिनीला ऑफिसमध्ये बोलावून तिला नवीन नकाब(गणवेश ) देतो असे आमिष दाखवून ऑफिस बंद करून तिला नको त्या ठिकाणी स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा घृणास्पद प्रकार येथे ३ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा सावदा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की ,शहरातील एक तेरा वर्षीय विद्यार्थिनी ही गोसिया नगर येथे शिकत असून दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संशयित अकरम खान अमानुल्ला खान रा. रजा नगर ,सावदा ता. रावेर याने तिला ऑफिसमध्ये बोलावून तुला नवीन नकाब देतो यासाठी तुझा टेलर सारखा माप द्यावा लागेल असे आमिष दाखवून ऑफिसचा दरवाजा आतून बंद करून लाईटही बंद केली. नकाबचे माप घेण्याच्या बहाण्याने मुलीच्या संवेदनशील भागाला स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच या प्रकाराची वाच्यता केल्यास तुला शाळेतून काढून टाकण्याची धमकी संशयिताने दिली.

मुलीने हा प्रकार तात्काळ मुख्याध्यापक इरफान खान जमशेर खान रा. फैजपूर ता. यावल यांना सांगितला. मात्र त्यांनीही घटनेबाबत कुठेच वाच्यता करू नये असे सांगून कोणासही न सांगण्यासाठी प्रवृत्त केले. सदर घटना मुलीने आपल्या आई वडिलांना सांगितल्याने ७ ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पीडीतेच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस स्टेशनला संशयित अकरम खान अमानुल्ला खान,इरफान खान जमशेर खान , फिरोज खान सुपडू, शेख अशरद शेख सईद दोघे रा. सावदा ता. रावेर या चौघांविरुद्ध भा.दं. वि. कलम-३५४,३५४ (अ ),(१),३४ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ८,१७ प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button