
मिल्लत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा
जळगाव आसिफ शेख I – मिल्लत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता ८ वीच्या विद्यार्थिनीने कुरआन पाकच्या तिलावतमधून केली. त्यानंतर विविध इयत्तांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी हिंदी भाषण, कविता, संभाषण आणि नाटिका सादर केल्या.
इयत्ता १२ वीच्या विद्यार्थिनी सनोबर सलीम हिने हरिवंश राय बच्चन लिखित “कोशिश करने वालों की हार नहीं होती” ही कविता प्रभावी अंदाजात सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तर इयत्ता ९ वीचा विद्यार्थी मोहम्मद साद सईद याने सादर केलेली कविता विशेष दाद मिळवून गेली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे पर्यवेक्षक श्री. सैयद मुख्तार सर यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा देत आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “कोणतीही भाषा ही फक्त विचारांच्या आदानप्रदानासाठी असते. आज हिंदी भाषेत देखील रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत.”
या कार्यक्रमाला भूगोल विभाग अध्यक्षा सौ. नाजेमा काजी, इंग्रजी विभाग अध्यक्षा सौ. मुस्फेरा शेख, तसेच सैयद आसिफ सर, फैज शाह सर, अता-उर-रहमान सर आणि हिंदी विभाग प्रमुख शेख झय्यान सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता १० वीच्या विद्यार्थिनी सोबिया अमीर खुसरो व फातिमा खटीक यांनी केले. तर आभार प्रदर्शन हिंदी विभागाच्या सौ. समीना मॅडम यांनी केले.





