
भारतीय पत्रकार महासंघाच्या डिजीटल मीडिया जिल्हाध्यक्षपदी निलेश अजमेरा !
जळगाव, (प्रतिनिधी ) : येथील पत्रकार तथा महापरिवहन न्यूजचे संपादक निलेश अजमेरा यांची भारतीय पत्रकार महासंघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.
भारतीय पत्रकार महासंघाच्या वतीने जळगाव जिल्हा डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्षपदी निलेश अजमेरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पाटील व उपाध्यक्ष राकेश कोल्हे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी सचिव प्रकाश सरदार आणि जेष्ठ पत्रकार शकील पटेल यांची उपस्थिती होती.
निलेश अजमेरा यांना प्रिंट आणि डिजीटल माध्यमाचा सुमारे पंचवीस वर्षांचा अनुभव असून त्यांनी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम अव्याहतपणे केले आहे. या अनुषंगाने त्यांच्यावर डिजीटल मीडिया विभागाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी लढा देणे, पत्रकारितेत पारदर्शकता व जबाबदारी राखणे तसेच डिजिटल मिडियाच्या माध्यमातून समाजातील प्रश्न प्रभावीपणे मांडणे ही महत्त्वाची जबाबदारी निलेश अजमेरा यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीबद्दल जिल्हाभरातून निलेश अजमेरा यांचे हार्दिक अभिनंदन होत असून, त्यांनी संघटनेचा विश्वास जपून निष्ठेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.





