
स्वस्थ नारी – सशक्त परिवार, राष्ट्रीय पोषण माह २०२५ अभियानाचा शुभारंभ
जळगाव प्रतिनिधी I शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे दिनांक १७ सप्टेंबर रोजी अभियानाचा भव्य शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष ऑनलाईन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री ना.रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार मा. राजू मामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मिनल करनवाल, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, सौ. रजनी सावकारे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या उपक्रमात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले तसेच निक्षय मित्र अभियानाची घोषणाही करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी स्वतः निक्षय मित्र म्हणून नोंदणी केली.या वेळी निक्षय मित्र याना प्रमाणपत्र तर लाभार्थी महिलांना आयुष्यमान भारत कार्ड चे प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.





