
वड्री येथे ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
यावल (बशीर तडवी) : वड्री गावात संघटनेची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडली. या सभेमध्ये संघटनेने वेळेवर खत विभाग सुरू करावा तसेच सरकारकडील थकीत भाडे वसूल करावे, असा ठराव सभेत मांडण्यात आला.
सभासदांनी संघटनेमार्फत बँक कर्जाची शंभर टक्के वसुली करण्यात आल्याबद्दल संचालक मंडळाचे आभार मानले. सभेस उमाकांत पाटील सभापती, रमेश सोना सावळे अध्यक्ष, लीलाधर भगवान चौधरी सदस्य, पंकज दिनकर चौधरी उपसरपंच, प्रमोद वसंत चौधरी सदस्य, विलास पंढरीनाथ चौधरी सदस्य, सुलेमान कान्हा तडवी सदस्य, सचिन दगडू चौधरी सदस्य, मुबारक सायबू तडवी सदस्य, अतुल भागवत भालेराव (अध्यक्ष क्रय विक्रय कृषि संघ, यावल), सरवर रुबाब तडवी सदस्य, मुकुंद बलिराम महाजन, छाया रवींद्र पाटील निदेशक, रेखा सुनील पाटील निदेशक तसेच सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वड्री गावातील अजय भालेराव, हाजी शत्रु वजीर, शरद वासुदेव चौधरी, अरमान रमजान तडवी, हुसैन साहेब तडवी, गोविंदा लोटू सुरवाडे, दिनकर धोंडू चौधरी, गोटू ओंकार धनगर, बशीर परमान तडवी, प्रकाश शामराव घुगे, इनुस अब्दुल तडवी, राजू छब्बू तडवी, प्रभाकर सावळे , कमल कान्हा तडवी, शेख इनुस शेख महमूद, आजी माजी तसेच वड्री परसाडे गावचे अध्यक्ष, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव सुनील सुरवाडे यांनी केले.





