खान्देशजळगांवधार्मिकसामाजिक

दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावदा पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक

दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावदा पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक 

सावदा, (प्रतिनिधी शेख मुख्तार) दि. 19 सप्टेंबर 2025: आगामी दुर्गा उत्सव सण शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी सावदा पोलीस स्टेशनच्या वतीने आज, शुक्रवार, दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 ते 11:30 या वेळेत सावदा पोलीस स्टेशन, ता. रावेर येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी मा. सुभाष ढवळे, सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, सावदा परिसरातील पत्रकार, गणेश मंडळांचे पदाधिकारी, हिंदू व मुस्लिम समाजातील प्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समितीचे सदस्य आणि सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.

बैठकीदरम्यान, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी दुर्गा उत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि मुस्लिम बांधवांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करताना उत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

सर्व उपस्थितांनी एकमेकांच्या भावनांचा आदर राखून उत्सव साजरा करण्याचे आश्वासन दिले. बैठकीत उपस्थित असलेल्या सर्वांनी शांतता आणि समन्वयाने उत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे ठरवले. सदर बैठक यशस्वीरीत्या संपन्न झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button