सावदा;- दुचाकी घसरून झालेल्या अपघातात डोक्याला मार लागून जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ईश्वर बाबुराव मोरे वैचारिक राहणार निंभोरा तालुका रावेर हे 31 जुलै रोजी सावदा स्मशानभूमीच्या पुढे दुचाकीवरून घसरल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना जळगावच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . मात्र दोन ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सहायक फौजदार महमूद शहा कादर शहा करीत आहे.