इतर

पशुवैद्यकीय अधिकारी मृतावस्थेत आढळले ; यावल शहरात खळबळ

पशुवैद्यकीय अधिकारी मृतावस्थेत आढळले ; यावल शहरात खळबळ

यावल I प्रतिनिधी यावल शहरातील एका विस्तारित भागातील घरातून नागरीकाकांना दुर्गंधी येत असल्याने पोलिसांनी याबाबत घराची तपासणी केली असता यावल पशु वैद्यकीय अधिकाऱयांचा मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे शहरात तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

यावल शहराचे पशुअधिकारी रतनलाल भगुरे असे या मृत अधिअकार्याचे नाव असून ते आत्माराम गुरूजी यांच्या मुश्तफा खान यांच्या ग्लोबल स्कूलच्यासमोर असलेल्या घरात ते राहात होते ते मूळ सेलू जिल्ह्य परभणीचे राहणार आहे. ते यावल गुरांच्या दवाखान्यात प्रभारी तसेच पाडळसा येथे कार्यरत होते. दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसांपासून ते कोणालाच दिसून आले नव्हते. आज त्यांच्या घरातून प्रचंड दुर्गंधी सुटल्याने शेजारील रहिवाशांना संशय आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घर उघडून पाहिले असता, रतनलाल भगुरे हे मृत अवस्थेत आढळून आले.

प्राथमिक तपासानुसार, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.दरम्यान त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदनातून स्पष्ट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button