
नाशिकचे नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार
नाशिक प्रतिनिधी: नाशिक जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज आपला कार्यभार स्वीकारला. अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आगामी कुंभमेळ्याच्या तयारीस गती देण्याबरोबरच नाशिक शहराच्या ब्रँडिंगवरही विशेष भर देणार आहेत.
आयुष प्रसाद हे अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असून भारतीय प्रशासनिक सेवेच्या २०१५ बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी धाराशिव येथे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी, घोडेगाव येथे आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, अकोला व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. याशिवाय ते जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही कार्यरत राहिले आहेत.





