
तांबापुर, फुकटपुरा, पंचशिल नगर परिसरातील स्ट्रीट लाईट बंद ; मनपाला निवेदन
जळगाव प्रतिनिधी: शहरातील तांबापुर, फुकटपुरा, पंचशिल नगर परिसरातील नागरिक रात्रंदिवस लाईट बंद असल्यामुळे सुरक्षिततेच्या संकटात आहेत. याबाबत नागरिक ईस्माईल खान कय्युम खान यांनी महानगरपालिकेच्या लाईट विभागाला अर्जाद्वारे तक्रार केली आहे.
आर्जदारांच्या मते, बाबा साहेब आंबेडकर पुतळा जवळ पंचशिल नगर, जोहर अरबी मदरसा गल्ली येथील स्ट्रीट लाईट बंद आहेत. रात्रीच्या अंधारात रहदारी असते, पण लाईट न चालल्यामुळे नागरिकांना चालताना त्रास होतो तसेच कुत्रे आणि काही असुरक्षित व्यक्ती त्रास देतात.
ईस्माईल खान यांनी म्हटले की, त्यांनी पूर्वी फोनद्वारे या बाबत माहिती दिली होती, परंतु अद्याप लाईट चालू झालेली नाही. त्यामुळे त्यांनी महानगरपालिकेकडे तातडीने स्ट्रीट लाईट चालू करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून नागरिक सुरक्षित राहतील.
सदर अर्जात अर्जदारासोबत मोईनोद्दीन शेख, गौतम सोनू सुरवाडे व अहमद खान असलम खान यांनीही सह्या केल्या आहेत.





