
गोर गरीब कुटुंबियांना आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते फराळ, मिठाई वाटप
जळगाव : दिवाळीनिमित्त जळगाव शहरातील तंट्या भिल वस्ती मध्ये ‘एक दिवा वंचितांसाठी’ उपक्रमाअंतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत दिवाळी फराळ, मिठाई व साड्या वाटपकरून दिवाळी साजरी करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, माजी महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, सदाशिवराव ढेकळे, महिला मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष नीतूताई परदेशी, दिपक परदेशी, राजेंद्र मराठे, मिलिंद चौधरी, सचिन बाविस्कर, नंदिनी दर्जी, रेखा वर्मा, संगीता पाटील, सागर पाटील, शक्ती महाजन, आशिष सपकाळे, माजी नगरसेवक विजय वानखेडे, भरत सपकाळे,
सदाशिव ढेकळे, मंडळ अध्यक्ष आनंद सपकाळे, विनोद मराठे, अजित राणे, विधी आघाडी प्रमुख महेश जोशी, एनजीओ सेल प्रमुख पंकज जैन, अनुसूचित जाती मोर्चा प्रमुख अनिल जोशी, ओ.बी.सी मोर्चा प्रमुख सुनील वाणी, दिपक बाविस्कर, शुभम विंचवेकर, किसन मराठे, युवा मोर्चा सरचिटणीस सागर जाधव व पदाधिकारी स्वप्नील चौधरी, उन्मेष चौधरी यांच्यासह सर्व जिल्हा पदाधिकारी, माजी नगरसेवक, जिल्हा मोर्चा आघाडी संयोजक, पदाधिकारी, मंडल पदाधिकारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





